शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
3
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
4
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
5
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
6
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
7
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
8
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
9
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
10
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
11
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
12
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
13
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
14
'स्मार्टफोनपासून दूर राहा आणि पुस्तके वाचा' मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुलांना सल्ला
15
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
16
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
17
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
18
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
19
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
20
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले

बलुतेदारीवर संशोधनासाठी जपानची प्राध्यापिका कुडाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 23:16 IST

मेढा : बारा बलुतेदार अन् भारतीय कला, भारतीय संस्कृती यांचे एक अनोखं नातं आहे. ही बलुतेदारी पद्धती कशी चालायची याची उत्सुकता आजही परदेशी नागरिकांना आहे. ्याच उत्सुकतेपोटी भारतातील बलुतेदारीवर पीएच.डी. करण्यासाठी जपान येथील प्राध्यापिका टोकुमो ओशिमो या भारतात आल्या असून, त्यांनी रविवारी जावळी तालुक्यातील कुडाळ गावाला भेट दिली. तसेच ग्रामस्थांशी ...

मेढा : बारा बलुतेदार अन् भारतीय कला, भारतीय संस्कृती यांचे एक अनोखं नातं आहे. ही बलुतेदारी पद्धती कशी चालायची याची उत्सुकता आजही परदेशी नागरिकांना आहे. ्याच उत्सुकतेपोटी भारतातील बलुतेदारीवर पीएच.डी. करण्यासाठी जपान येथील प्राध्यापिका टोकुमो ओशिमो या भारतात आल्या असून, त्यांनी रविवारी जावळी तालुक्यातील कुडाळ गावाला भेट दिली. तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांनी पारंपरिक चालीरितींची माहितीही जाणून घेतली.बारा बलुतेदार अन् बाजारपेठ यांचे पूर्वी एक आर्थिक देवघेव मात्र वस्तू रुपाने असे व्यवहार चालत. यामध्ये बारा बलुतेदार उत्पादन केलेल्या वस्तू ग्राहकांना देत अन् त्याबदल्यात धान्य, वस्तू घेत. आर्थिक नाणी, चलन, नोटा यांचा वापर न करता वस्तूच्या मोबदल्यात वस्तू अशी बाजारपेठ चालायची. मात्र, त्याकाळी नाणी, नोटांचा वापर कमी असल्याने वस्तूचे मूल्य हे वस्तुरुपातच व्हायचे अन् हे व्यवहार कसे व्हायचे, बारा बलुतेदारी अन् बाजारपेठ कशी चालायची यावर जपान येथील विद्यापीठात पीएच.डी. करण्यासाठी जपान येथील प्राध्यापिका टोकुमो ओशिमो या सध्या साºया भारतभर फिरत आहेत.आज त्यांनी जावळी तालुक्यातील कुडाळ येथे कुंभारवाडा परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी कुंभारवाड्यात विटा, चुली, मडकी, बैल आदी वस्तू कशा बनवल्या जातात. या वस्तू पूर्वी बलुतेदारी पद्धतीने कशा देवघेव केल्या जायच्या, आजही बलुतेदारी सुरू आहे का? आदी विषयाबाबत माहिती घेतली. यावेळी कुंभारवाडा परिसरातील नागरिकांनी याची माहिती देत संत गोरोबा कुंभार यांच्याविषयीही माहिती सांगितली. यावेळी प्राध्यापिका ओशिमो यांनी आपल्या पीएच.डी.मध्ये एक वेगळा विषय म्हणून संत गोरोबा कुंभार यांचे नाव घेण्याबाबत सूतोवाच केले. यावेळी न्हावी, चांभार आदी समाजातील व्यवसायाबाबतही त्यांनी माहिती घेतली.त्यांचेबरोबर दुभाषी म्हणून पुणे येथील वर्षा कोंडवीकर होत्या. कुडाळचे सरपंच वीरेंद्र शिंदेयांनी स्वागत केले. यावेळी मालोजीराव शिंदे, राहुल ननावरे, कांबळे गुरुजी, ग्रामविकास अधिकारी पालवे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.आठ वर्षांनंतर पुन्हा भेटप्राध्यापिका ओशिमो या आठ वर्षांपूर्वी कुडाळ येथे आल्या होत्या. येथील शमराव शिंदे यांच्या घरी त्यांनी पाहूणचार घेतला होता. याचवेळी त्यांनी बारा बलुतेदारी संदर्भात ग्रामस्थांकडून माहिती जाणून घेतली होती. बलुतेदारीवर संशोधन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले होते.